आधुनिक
कला संदर्भात विचार करताना मला असे दिसून आले .की नव्याण्णव टक्के
कलाकार हे फ़क्त मनोरंजनाचे पुस्तक
किंवा माहितीची जाहिराती साठी जे काही कथा
कविता वर्णनात्मक चित्रण करावे लागते . तश्याच प्रकारची
चित्र छापत आहेत . तसं चित्र काढणं वाईट नाही .पण त्यामुळं मुख्य
कले मधून खरी कला गायब झाली आहे . नेहमीच्या गेलेरीच्या पांढऱ्या खोक्याच्या आत कला असेंलच
असं नाही . बाहेरच जे जग आहे
.त्यात कला आहे .असे मला वाटतं.
त्यामुळं
प्रदर्शन भरवत असताना . नवीन प्रयोग करणाऱ्या कलाकारांना ऑन लाईन संधी देणे गरजेचे वाटते . त्यामुळे मी तीन तरुण प्रयोगशील अभिव्यक्ती करणाऱ्या चित्रकारांची निवड केली आहे . हा एक प्रयोग
आहे हे मला माहीत
आहे .
भारतात
अनेक चित्रकार कला शिक्षण घेऊनच चित्र काढताना दिसतात .आर्टिस्ट कमी आहेत . असतील तें जगा समोर येत नाही त्यांना ऑन लाईन जगा
समोर आणावं असे मला वाटतं म्हणून मी नीप्पोन नावाची
गँलरी मुंबईत प्रत्यक्षात केली आहे . आमची गँलरी ही नवनवीन प्रयोग
करणाऱ्याना उत्तम संधी निर्माण करुन देते असा हेतु आहे . सध्या च्या ऑन लाईन प्रदर्शना
निमित थोडसं …
हीना
शेख .भूषण भोँबले .शंतनू देबनाथ या तिघांचे ऑन
लाईन प्रदर्शनाचा प्रयोग मी करत आहे
.
हिना शेखचा जन्म पुणे, महाराष्ट्र, येथील असून . तिने बी.एफ.ए
फाईन आर्टचे शिक्षण भारती विद्यापीठातून आणि एम.एफ.ए
शिक्षण हे एस.एन.डी.टी मुंबई
विद्यापीठातून पूर्ण केले. ती मुस्लिम कुटुंबातील
आहे . बहुतेक वेळा तिच्या कुटुंबीयांनी तिची चित्रकला बंद केली. लहानपणापासूनच
चित्रकार एम एफ हुसेन
हे तिचे प्रेरणास्थान
आहेत . भारतीय विचारवंत जे. कृष्णमूर्ती आणि चित्रकार वि .एस. गायतोंडे व पॉल क्ली
, नसरीन मोहम्मदी यांचा प्रभाव व प्रेरणा ती
मान्य करते .
Artist : Heena Shaikh : Size 22x30in Acrylic on Paper |
हिना
हिने आपल्या कारकिर्दीची सुरूवात तिच्या कुटुंबातून प्रेरणा घेऊन केली, तिचे कुटुंबातील सदस्य साइनबोर्ड पेंटर आहेत . आणि त्यापैकी बहुतेकजण चित्रपटाच्या डिझाइनसाठी काम करतात , तिला जुन्या कॅलेंडर डिझाईनची आवड आहे . प्रेरणा घेत प्रयोग करत राहणे तीला आवडते .
हीना म्हणते , चित्र प्रकार हा दोँन शिखराच्या
मधील एक पूल असतो
. भावना व इच्छा आणि
इच्छेस असणारा रंग निवडून ती चित्र रंगवत
जाते . तिचा स्वतः चा शोध सुरू
राहतो . हीना म्हणते . मी कल्पिलेंल्या , अनुभवलेल्या
गोष्टी रंगवतें .
Recent work by Bhushan Bhomble |
भूषण भोँबले , याचे कला शिक्षण जी
.डी आर्ट , हे एल एस
रहेजा स्कूल ऑफ आर्ट , मुंबई.
इथे झाले . डीप्लॉमा इन आर्ट एज्युकेशन
हे सर जे.जे.
स्कूल ऑफ आर्ट, मुंबई.
इथे झाले .शिक्षणानंतर कला प्रवास करताना भूषण म्हणतो मला जे आवडते तें
मी रंगवतो .मला जे आवडते ते
चित्रित करतो , ती व्यक्तिनिष्ठ चित्रकला
नाही , ती मला आवडत
असलेली प्रक्रिया आहे ,त्या प्रक्रिये सोबत जेव्हा माझा प्रवास सुरू होतो , त्या वेळेचा परिणाम माझी कला असते . तिथे मी असतो . चित्रकार
प्रभाकर बर्वे, डॅमियन हिर्स्ट इत्यादी महान कलाकाराकडून प्रेरणा घेऊन कला प्रवास करताना . भूषण म्हणतो ' नैसर्गिक अभिव्यक्ती
' , ज्याचा मी संपूर्ण आनंद
घेत आहे .नैसर्गिक अभिव्यक्ती हाच विचार त्याचा विषय आहे .
शंतनू देबनाथ हा मूळचा कोलकाताचा
आहे . त्याचे बी.एफ.ए चे
कला शिक्षण तिथेच झालं . कोलकाता मध्ये बालपण गेले . त्यामुळे त्याच्या चित्रकलेचे
विषय त्याच्या लहानपणी
ज्या गावात वाढला .त्या गावातून त्याला सापडले .
जेव्हा जेव्हा तो त्याच्या गावात
परतला तेव्हा तो व आजूबाजूचे
लोक, वातावरण, यात नवीन भावनेने एकरूप होत जातो .त्याला गावातील अनेक अनैतिक विधी आणि चालीरीती समजल्या गेल्या आणि त्यापासून प्रेरणा मिळाली .त्याला त्यामुळे एक अखेरची जाणीव
झाली , की त्याच्या गावातली
रहस्यमय वातावरण त्याच्यासाठी एक अपरिहार्य प्रेरणा
बनली आहे, ज्याने त्याला त्याची चित्रे
तयार करण्यास प्रेरित केले.
त्याच्या
आसपास राहणाऱ्या लोकांची मूळ जीवनशैली व्यक्त करण्याचा आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न तो करतो आणि
त्यांचे शारीरिक हावभाव ठेवण गुण एका वर्णनकथात्मक आणि डोळ्यांना स्पष्ट नसलेल्या सोप्या पद्धतीने रंगवतो .बर्याचदा त्याच्या चित्रातील आकृती एकाकी अवस्थेत दर्शविली जातात . जी त्यांच्या सामान्य
जीवन व्यवसायाचा व्यवहार व्यवस्थेचा परिणाम आहे . त्याला आता माझ्या गावात काम करण्याची सवय झाली आहे . त्याचे समकालीन कार्यकाम आणि त्याचे गाव यांच्यात खूप जवळचे नाते आहे.शंतनू हे दृश्य कथनकार
आहेत .
तीन
ही कलाकार स्वतंत्रपणे चित्र प्रवास करत आहेत .पण प्रत्येकाचं वेगळे
असणं नैसर्गिक आहे .यांच्यात सारखेपणा आहे , तो असा की
तें म्हणतात . तें निसर्गाच्या व मानवी मनाच्या
प्रेरणेने काम करतात .यांच्या
निमित्ताने मी जेव्हा सर्वत्र
पाहतो तेव्हा मला जाणवते तें प्रत्येक जण कोणा ना
कोणाच्या प्रभावा खाली काम करत आहेत . कोणी त्यांचे विचार घेतात. कोणी चित्रआकार रचना घेतात
.
पॉल क्ली किंवा गायतोंडे याच्या रंगीत चित्रांच्या सारखे अनेक चित्र दिसतात . संदेश चित्र म्हणजे जाहिरात दृश्य नरेटिव बातम्या वाटतात . म्हणून मी म्हणतो नव्याण्णव 99% टक्के लोक फ़क्त उदारहण आणि वर्णन कथनात्मक काम करतात .त्यात कला नसते . जाहिरात, बातम्या, संदेश, घोषणा आदेश देणारी, अशी सर्वच चित्र वाटतात .गेलरी सुध्दा चौकटीच्या बाहेरच प्रदर्शनाला तयार होत नाहीत .यांच्या निमित्तानं मी चौकटीच्या बाहेरील कला प्रयोग करणाऱ्या साठी प्रयत्नशील आहे . काहीजण स्वःताला पोलिटिकल आर्टिस्ट समजतात . हा त्यांचा मोठा भ्रम आहे .कारण चित्रकार पिकासो याने गूर्निका हे जगप्रसिद्ध चित्र बनवले तेव्हा त्याच्या मनात हा विचार नव्हता की पिकासो पोलिटिकल आर्टिस्ट आहे .लोकानी काही काळानंतर तसा विचार मांडला .आज जे भारतात पोलिटिकल आर्टिस्ट आहेत .तें मूळचे राजकारणी स्वभावाचे आहेत .राजकारणी आहेत हे नक्की दिसतय .म्हणून त्याच्या चित्रात ललितकला नसते . म्हणून ज्याना प्रयोग करायचं आहेत त्यांचे स्वागत आहे . विचार मांडायचे आहेत स्वागत आहे .
पॉल क्ली किंवा गायतोंडे याच्या रंगीत चित्रांच्या सारखे अनेक चित्र दिसतात . संदेश चित्र म्हणजे जाहिरात दृश्य नरेटिव बातम्या वाटतात . म्हणून मी म्हणतो नव्याण्णव 99% टक्के लोक फ़क्त उदारहण आणि वर्णन कथनात्मक काम करतात .त्यात कला नसते . जाहिरात, बातम्या, संदेश, घोषणा आदेश देणारी, अशी सर्वच चित्र वाटतात .गेलरी सुध्दा चौकटीच्या बाहेरच प्रदर्शनाला तयार होत नाहीत .यांच्या निमित्तानं मी चौकटीच्या बाहेरील कला प्रयोग करणाऱ्या साठी प्रयत्नशील आहे . काहीजण स्वःताला पोलिटिकल आर्टिस्ट समजतात . हा त्यांचा मोठा भ्रम आहे .कारण चित्रकार पिकासो याने गूर्निका हे जगप्रसिद्ध चित्र बनवले तेव्हा त्याच्या मनात हा विचार नव्हता की पिकासो पोलिटिकल आर्टिस्ट आहे .लोकानी काही काळानंतर तसा विचार मांडला .आज जे भारतात पोलिटिकल आर्टिस्ट आहेत .तें मूळचे राजकारणी स्वभावाचे आहेत .राजकारणी आहेत हे नक्की दिसतय .म्हणून त्याच्या चित्रात ललितकला नसते . म्हणून ज्याना प्रयोग करायचं आहेत त्यांचे स्वागत आहे . विचार मांडायचे आहेत स्वागत आहे .
गेलेरीत चित्र पाहताना तुम्ही जे बाहेर घेवून
जाता तीच ललितकला (Fine Art) आहे .- तथी प्रेमचंद ,
लेखन - तथी प्रेमचंद ,
निप्पॉन
गैलरी
कलाकार
आणि कला
प्रबंधक
संकेत
स्थळ : - www.nippongallery.com