मध्यमा "
20 व्या शतकात दादाइझमने कलेचे स्वरूप बदलले . पारंपरिक कला, साहित्य आणि सामाजिक मूल्यांची टिंगल टवाळी केली , तसेच प्रकट भाष्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेऊन निर्मिती करण्यात आली .
सौंदर्यशास्त्र आणि कल्पकतेला नाकारून विसंगत, अव्यवस्थित आणि असंबद्ध कलेला महत्त्व देण्यात आले. संवेदनशीलतेचे पुनर्निर्माण केले युद्धाच्या क्रूरतेविरोधात प्रतिकार केला, तर दुसरीकडे समाजाच्या पारंपारिक विचारसरणीला विरोध केला.याचा परिणाम संपूर्ण जगात समांतर राहिला
![]() |
आनंद प्रभुदेसाई |
परंतु प्रादेशिक मूळ संकल्पना सौंदर्यशात्र याद्वारे निर्मिती होतच राहिली .
आकारवादी, आणि चैतन्यवादी विचारधारांचा पगडा कायम चित्र निर्मितीवर या काळातही राहिला आहे . आकारवादी विचारसरणी, कलेला एक तटस्थ आणि शुद्ध तंत्र म्हणून पहाते या दृष्टिकोनानुसार, कलाकृतीतून कर्ता किंवा कलावंताच व्यक्तिमत्व किंवा भावना वगळल्या आणि त्याऐवजी कलेच्या तंत्र, साधनांची आणि रचनात्मक गुणविशेषांचीच चर्चा केली. आकारवादाच्या तत्त्वज्ञानानुसार, कलाकृती त्या कलेच्या स्वरूपानेच पहायच्या असतात. कलावंताची भावना, संदेश किंवा उद्देश हे अप्रचलित ठरवले जातात. कलेची मापदंड असलेल्या तंत्रात्मक घटकांमध्ये रसिकाच्या किंवा कलावंताच्या व्यक्तिगत आस्थांचा सहभाग असू नये. या प्रकारच्या तत्त्वज्ञानामध्ये, कलेचे शुद्ध मूल्य त्याच्या रूपातील सामर्थ्यात आहे, ज्यात विचार, धोरणे आणि नियमांचा वापर केला जातो.
तसेच कलेतील चैतन्यवादी विचारधारा अधिक व्यक्तिमत्त्वाच्या बाजूने उभी राहते. या विचारधारेनुसार, कलेच्या अस्तित्वात कलावंताची भावना, व्यक्तिमत्व, आणि अनुभव मुख्य आधार होतात. कलावंत आणि रसिक यांचे भावनिक संबंध, या कलेतील सौंदर्याचा मुख्य स्रोत मानले जातात. या विचारधारेच्या मदतीने, कलावंत आपल्या भावना आणि विचार सामर्थ्याने व्यक्त करतात. कलेची अंतिम उद्दिष्ट म्हणजे प्रेक्षकांच्या अंतर्मनाशी एक भावनिक संवाद साधणे. कलेच्या माध्यमातून केवळ सौंदर्याचा अनुभव नसून, त्यात संकल्पना, विचार, आणि अनुभूतींची एक नवा दृष्टीकोन साकारला जाणे . या वैचारिक धाटणीतूनच आनंद प्रभुदेसाई यांनी मध्यमा या बोटाचा प्रतीकात्मक वापर कलेच्या आपल्या व्यक्तिगत भावना, विचार, आणि समाजातील विरोधाभास व्यक्त करण्यासाठी येथे केला आहे. भारतीय तत्वज्ञानात मध्यमा बोट एक शक्तिशाली प्रतीक आहे, जे तत्त्वज्ञान आणि कलेत व्यक्त होणाऱ्या विविध भावनांचे प्रतिनिधित्व करते. या बोटाचा वापर सामान्यतः क्रोध, विरोध, स्वातंत्र्य, बंडखोरी आणि अन्यायाच्या विरोधाचे प्रतिक असते.
आनंदने मध्यमा बोटाचा वापर करून आपल्या भावना आणि विचार स्पष्टपणे व्यक्त करीत आहे. हा एक शारीरिक संकेत नाही, तर शिल्पांतून एक सामाजिक आणि राजकीय संदेश देत आहे. यातील धक्का देणारा घटक म्हणजे सुप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे हया शिल्पावर छापली आहेत.
परंतु ही मध्यमा या चित्रांकडे पाहणाऱ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करीत आहे . आनंदने त्याच्या भावनांचा मध्यमा आणि या प्रसिद्ध चित्र याद्वारे प्रभावी संवाद साधून, बघणारयाना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे . या कृतीने कलेचा संवाद अधिक अर्थपूर्ण आणि गंभीर होत आहे . सामाजिक आणि राजकीय विरोधदेखील प्रखरपणे मध्यमा बोटाचा वापर करून केला आहे . इतिहासातही अनेक कलाकारांनी या बोटाच्या प्रतीकाद्वारे सत्ताधारी वर्गांच्या अत्याचारांना विरोध केला आहे. मध्यमा बोटाचा वापर समाजातील भिन्नतावाद आणि अन्यायाच्या विरोधात कलेच्या माध्यमातून कलाकार करतात आणि असमानतेच्या विरोधातील आपला संदेश प्रेक्षकांना पोहचवतात.
आनंदने शिल्पांद्वारे सत्ताधाऱ्यांचे धोरण, कृत्य आणि विचारधारा नाकारत आहे यामुळे त्याच्या शिल्पांचे कार्यक्षेत्र केवळ व्यक्तीगत भावनांवर आधारित राहून देखील त्याची सामाजिक आणि राजकीय दृष्टीकोनातून प्रभावीता वाढविताना दिसतेय
आनंदची हि शिल्प (मध्यमा )एक शक्तिशाली संवादाचे साधन आहे. कलेच्या माध्यमातून प्रकट झालेल्या या प्रतीकाद्वारे, त्याने कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील संबंध अधिक दृढ केले आहेत .
त्याने ज्या ज्या अर्थाने मध्यमा बोटाचा वापर केला आहे आणि त्यांची मांडणी केली आहे त्याद्वारे भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावहारिक संदर्भानुसार वेगवेगळे होताना दिसतील.
आनंद ची हि शिल्पे समाजाच्या संवादाचे प्रमुख साधन बनत आहेत तो संवाद सौंदर्याचा अनुभव देत नाही, तर ती समाजातील अन्याय, वर्चस्व आणि असमानतेविरुद्ध आवाज देखील बनताना दिसत आहे
आकारवादात कलेचे शुद्ध तंत्र महत्वाचे असते, तर भावनावाद कलेतल्या अंतर्मुख भावना आणि तात्त्विक संदेशांचा महत्त्व घेऊन येतो. त्याचप्रमाणे, आनंदने निवडलेले मध्यमा बोट हे एक शक्तिशाली प्रतीक असून , ते विविध सामाजिक आणि राजकीय संदर्भातून शिल्पाना नवीन अर्थ , आणि समाजाला जागृत करण्याचे एक प्रभावी साधन बनले आहे.
स्मिता निलेश ...2025