Tuesday, 21 July 2020

Nippon Gallery Presents Drawings by Ritesh Bhoi "Falling on Earth"


आपल्या आयुष्याततीन महिने मागे वळून पाहिलं तर हा lockdown  (माझ्यासकट) सर्वांना सुखाचीपर्वणी देणारा होता. (कारण हि वेळ पहिल्यांदाच आली होती) घरच्यांसोबत इतके आनंदी सुखाचे दिवस मिळाले. प्रत्येकजण आपापल्या विचाराने जसा जमेल तसा आनंद शोधत वेळ घालवत होता. आपले छंद, आवडी-निवडी  जोपासायला, नवनवीन काहीतरी शिकायचं अस म्हणता म्हणता नव्याचे नऊ दिवस निघून गेले. आणि या सर्व गोष्टीतलं नावीन्य हरवलं. सुरवातीला या सगळ्या गोष्ठी खूप मजेशीर वाटत राहिल्या. ठरविक एक वेळ निघून गेल्यावर आपली वैचारीक व संवेदनशील मन हळू हळू झालेल्या आणि होणाऱ्या गोष्टीवर विचार करू लागतात. आता पर्यंत ठीक होत पण आता इथून पुढे काय? असा प्रश्न उभा राहतो येणारा प्रत्येक दिवस हा नवीन प्रश्न घेऊन येतोय. प्रत्येकाने lockdown मध्ये केलेलीto do list आता ती संपली आहे. आता प्रश्न आहे तो आयुष्याच्या todolist चा.

सरकारने सुरक्षिततेच्या दृष्टीने lockdown जाहीर केला. तेंव्हा मि मुंबई मध्ये होतो. एकूण परिस्थिती चा विचार करता मी लगेच माझ्या गावी मिरज ला आलो. येताना दहा-पांधरा दिवस पुरेल इतकेच पेंटिंग चे समान व कपडे घेऊन आलो होतो. मुंबई मधून आल्यामुळे मला चौदा दिवस Home Quarantine करण्यात आले. या चौदा दिवसात मी माझी अपूर्ण राहिलेली पेंटिंग ची कामे आणि काही नवीन कामे पूर्ण करून घेतली.  नवीन कामातील एक काम अर्धवट राहील कारण आणलेले कलर संपले. आता कलर आणि इतर साहित्य घेउन येणे शक्य नव्हते. तोपर्यंत पुढाचा lockdown जाहीर झला. आता मात्र परिस्थिती वेगळी होती. पेंटिंग करायला कलर नव्हते. वाचन करायला पुस्तक घेऊन आलो नव्हतो. गावतील लायब्ररी बंद होती. त्यामुळे वाचन बंद झाल. मोबईल नेटवर्क पण बंद. त्यामुळे बसून राहण्याशिवाय काही पर्याय नाही अस झाल. दहा पंधरा दिवस असेच गेले,घरी कोणी येत नव्हते आणि आम्हीही कुठे जात नव्हतो. घराच्या पोर्च मध्ये बसून अत्यावशक सेवेतील लोकांची ये जा, सरकारी कर्मचारी, व्यापारी, शेतकरी अशी ठराविकच लोक मला दिसत होते. आणि पोर्च मध्ये बसल्या बसल्या या सगळ्यांच निरीक्षण करणं इतकचं मि करू शकत होतो.

        पण प्रश्न असा होता कि निरीक्षण तरी किती दिवस करणार कारण तोपर्यंत पुढा lockdown जाहीर झला होता. त्यामुळे मी काही प्रयत्न करून एक कोरी डायरी आणि पेन यांची जमवाजमव केली. माझ्या पाहण्यात आलेल्या या लोकांच्या चर्चा, त्यांना प्रशासनाने दिलेली जबाबदारी, एकूणच आलेली परिस्थिती, त्या परिस्थितीवर प्रशासनाच नियंत्रण, या सगळ्यामध्ये काम करणारे लोक, आलेल्या काळाच गांभीर्य, आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी घेतली जाणारी काळजी. अश्या ज्या ज्या गोष्टीच मी निरीक्षण केलं ते मी माझ्या डायरीमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न करू लागलो. सुरवातीला या सगळ्या गोष्ठी खूप वेगळ्या होत्या पण मीत्या सेवेतील लोकांसोबत मीएक माणूस म्हणून जेवा बोलू लागलो त्यांची काळजी करू लागलो. त्यांच्यासोबत चर्चा केली.त्यावेळी लक्षत आल कि आलेल्या परिस्थितीला तोंड देत असताना, इथून पुढचा प्रवास कसा असेल.या सगळ्याचा मीजेंव्हा विचार करू लागलो तेंव्हा मलासुद्धा या अत्यावशक सेवेतील माणसांनी लावलेल्या मास्क मागील त्यांचा खरा चेहरा, आपल्या परिवाराबद्दल काळजी, भविष्याचा प्रश्न, पोटासाठी अन्न धन्य. हे सगळ कोरोनामुळे आलेल्या संकटापेक्षा हि खूप गंभीर प्रश्न सामान्य माणसाला सतावत आहेत. आपण ठीक आहे घरी बसूनआहोत. पण हे सेवेतील लोक जे प्रशासनाबरोबर आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांना या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे, तरी ते आपल कर्तव्य करत आहे. त्यांच्याशी बोलताना बरीच चर्चा झाली. त्याचं बोलन आणि त्यांनी मास्क लावल्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हता पण त्यांचे  डोळे खूप काही बोलत होते. काळजी, भीती, प्रेम, कर्तव्य, जबाबदारी हे सगळ त्या डोळ्यात जाणवत होते. आणि माझ्या संवेदनशील मनाला भावलेलं ते चित्र मीरोज रेखाटत होतो.
त्यातील काही चित्र हि पुढीलप्रमाणे आहेत

SAVE DATE : 25 July 2020/ 11am NIPPON ONLINE SOLO

Nippon Gallery
Presents
Drawings 
by
Ritesh  Bhoi 
"Falling on Earth"
Welcome to Nippon Gallery, a digital platform to connect artists with art collectors globally.Log on to our Online Platform to discover more about these Indian artists
and high-caliber artworks from studio.

Venue: Gallery Hall 4 

25th to 4th August 2020 
........................................................................................
NIPPON GALLERY 30/32, 2nd Floor, Deval Chambers,Nanabhai Lane, Flora Fountain, Fort,Mumbai – 400 001 India.



No comments:

Post a Comment

Thanks for comment JK