Saturday, 4 May 2019

According to Revati, the self-reflection stemming from challenges related to exclusion... - Hansodnya Tambe


Inquisitiveness is a basic human instinct. The urge to process and analyse visual information is the genesis of artistic innovation. Remembrance of things past is a result of the beholder’s visual sensitivity and unyielding curiosity. It is through this prism that a human seeks to track the central focal points of his life, i.e. through contemplation. It serves as a means to delve into the depths of art. ‘Art’ is the essence of human experience. Concepts such as existence, love, pleasure, or truth are abstract forms of artistic visual creations.

An artist’s painting is nothing but an attempt to self-contemplate through in-depth exploration of various visual forms. Such quest resides at the core of any true artist or connoisseur.  It is precisely such inquisitive exploration that forms the basis of Revati’s paintings. Her academic training in Fine Arts, and deep deliberations on her themes, is evident in her creative expressions. 

The artist’s clarity about her character’s personalities, and her endeavour to use them for discovering intellectually-stimulating visual forms serve as a means to view her paintings. She believes her concepts are deep-rooted in everyday experiences. According to Revati, the self-reflection stemming from challenges related to exclusion, interpersonal conflicts, despair, denial, or rejection set us on unknown pathways/ odysseys. Painting is one such pathway, and in such creative expression lies art, she says. Simply put, paintings are a gateway. They help enhance one’s personal life through experiential knowledge, as much as truth, compassion, happiness, love, etc. do. Life itself is an inspiration then. 



Revati’s visual expression uses familiar experiences, thoughts, objects, structures, settings, and pictorial elements, presenting them as a story board/ screenplay, making the different works seems like a serialized novel. The viewers are free to interpret the paintings their own way, since ‘storyline’ is the prominent premise of each artwork, which can be subjective. The sketches, forms, textures, and compositions in her paintings sometimes veer towards realism. However, at the point where the (metaphorical) representation of the visual inquisitiveness transcends towards extremely-realistic depictions – is where her art becomes mysterious – requiring careful coding-decoding of the visuals to enjoy its best impact. It appears that the story has been narrated through discerning occupation of the entire canvas space using visual forms, instead of dividing it.

A lot of artists strive to subdue or inflate their egos or entities, during their process of self-contemplation. Such attempts seem absent in Revati’s paintings. Curiosity appears to be the prime driver of creation, giving the figures, shapes, colours and textures in her paintings, a touch of naivety or innocence. The works are sprinkled with dreamy poeticism. One of the works evinces the visual sensitivity of the realist painter and printmaker, Edward Hopper. There is an urban tone to the treatment of the paintings, as well as the rendering and application of colours. The passionate pursuit to carve out one’s own emotional, imaginative, and inquisitive space amid the comfortable, yet chaotic life of the city is evident through the series.

It is imperative that art must be viewed with an open mind and a clean heart, with total devotion and submission. And only once the ‘viewing’ is done, that the process of ‘feeling’ begins. That’s how it is!

- Hansodnya Tambe



जिज्ञासूदृश्यघडण

'जाणणे' हा मनुष्याचा गुणधर्म आहे.दृश्य जिज्ञासूवृत्ती ही कलेच्या अन्वेषणाची जननी आहे. पाहण्याची संवेदनशीलता व जिज्ञासूवृत्ती यामुळे स्मृतीरूपांची शृंखला तयार होते.यातून मनुष्य जीवनाच्या केंद्रस्थानी स्वःताला रूजवू पाहतो.हा स्वाध्याय आहे. तेव्हा आपण कलेच्या गाभाऱ्यात पोहचतो.'कला' मानवी जीवनाचा अनुभव आहे.जीवन, प्रेम, आनंद, सत्य ही कलेच्याच दृश्य जीवनमितिची अदृश्य रूपं आहेत.
चित्रकृती मधून दृश्य जिज्ञासाच्या रूपाने आत्म-अन्वेषण करणे. हा चित्रकारांचा, रसिकांचा स्वभाव गुणधर्म आहे. जिज्ञासेचा हाच गुणधर्म 'रेवती' यांच्या चित्रकृतींचा आधार आहे.इथे जिज्ञासा हि रेवती यांच्या चित्रकृतींची जननी आहे. हे चित्रकृतीतून दिसून येते.
रेवती यांच्या कला शिक्षणाचा, रीतसर कलाअभ्यास व अध्ययन पूर्ण झाले असून, चित्र अभिव्यक्ती करताना तें त्याचा योग्य उपयोग करतात.रेवती यांच्या चित्रकृतींचा स्वभाव व स्वतःच्या चित्र निर्मितीच्या बाबतचा, दृश्य वैचारिक शोधबोध, हा त्यांच्या व्यक्तीगत पातळीवर स्पष्ट असल्याने, त्यांच्या विचारांच्या आधारे त्यांच्याच चित्रित दृश्याला पाहण्याचा एक मार्ग सापडतो. त्या म्हणतात त्यांचे विषय जीवनानुभवाशी निगडीत आहेत.जीवनांत येणारे मानवीय संघर्ष, असंतोष, अपवर्जनांची आह्वाने, अस्वीकार, निराशा, आणि असहमतीचा प्रभाव यातून आपण आत्म-अन्वेषण करून मार्गस्थ होतो. हा एक मार्ग म्हणजे 'चित्रकृती' किंवा अभिव्यक्ती होय. यालाच त्या कला असे म्हणतात. म्हणजे चित्रकृती एक महाद्वार आहे.सत्य,आनंद, प्रेम करूणा या बरोबरच स्वताचे ज्ञानानुभवात्म्क व्यक्तिगत जीवन समृध्द करायला चित्र योगदान करतात.त्यांना ही जीवन यात्राच प्रेरणा देते.



रेवती यांच्या सचित्र दृश्यअनुभवाचा मार्ग हा सभोवतालच्या ओळखीचा अनुभव, विचार, वस्तू,वास्तु, निसर्ग, दृश्य यातील आकारीक अनुभव कथांना, कथनरुपात साकारत चित्रकृती पूर्ण करतात.म्हणून त्यांची दृश्य सचित्र कांदम्बरीच्या शृंखलेत साकारलेली जाणवतात. म्हणून त्यांच्या चित्रकृतींची स्वभावभाषा सचित्र नवनीत कथापटाप्रमाणे भासतें.

'कथन' हे चित्रांचे मुख्य वैशिष्ट्य असल्याने, तें प्रत्येक रसिकांनी स्वताच्या अनुभव संचितानुसार अनुभवावे.चित्रकृतीत रेखाटन,आकार,पोत, रचना, याद्वारे दृश्यकथन गुंफताना, दृश्यकथानक कधी कधी अतिवास्त्वाच्या यथार्थ चित्रणाकडे वळणघेते. चित्रकर्तीच्या जिज्ञासेचा वास्तवातल्या रूपकाकडून, कल्पनेतील अतिवास्तवाच्या रूपाकडे कल गेलेला दिसून येतो.तेव्हा ती चित्रकृती गुढ होवू लागते.मग दृश्यांचे कूट (कोडिंग) उकल (डिकोडिंग)करत चित्रकृतींचा रसास्वाद घ्यावा लागतो. चित्रांमध्ये अवकाश विभाजनापेक्षा, अवकाश आकारीक संवेदनेने व्यापून दृश्य कथन चितारलेले दिसते.


आत्म-अन्वेषण करतांना स्वताचे अस्तित्व, अहंकार शमविण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेक चित्रकृतीकार प्रयत्न करतातच.याची छटा रेवती यांच्या कृतीत दिसत नाहीत. येथे फक्त जिज्ञासा दिसूनयेतेम्हणून त्यांच्या चित्रातील आकृती, आकार,रंगअंग, पोत, रचना, अप्रौढ, निरागस, अप्क्व, निष्पाप धाटणीच्या दिसून येतात. चित्रकृतीत स्वप्नील काव्यमयता विखुरलेली आहे. एका चित्रकृती मध्ये एडवर्ड हॉपर सारखी दृश्यसंवेदना स्पर्शून जाते.शहरीधाटणीची संवेदना व रेखाटन, रंगलेपन पद्धती आहे.समृध्द जीवनाच्या अडगळीत व शहरीकरणातील जगण्यात स्वताच्या भाव विश्वाचा, कल्पनारम्य विश्वाच्या वातावरणात जिज्ञासूवृत्तीने शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न दिसून येतो.
   
मनांतला ओरखडा आज बहरून आला । 
                                      आठवणींच्या फुलांचा सडा पडून गेला ॥ 



   
कला हि निसंशय श्रध्दा असेल तरच अनुभवता येते. कलाकृती हि विश्वास ठेवूनच पहावी लागतें. पहाणं पूर्ण झाले की, जाणवणे शुरू होते. इतकंच! 


-   हंसोज्ञेय तांबे