मन हे चंचल असते .असे म्हणतात .बुध्दी जर बुध्दासारखी असली, तर तिचा सांस्कृतिक परिणाम अनेक अंगांनी बहरेल .यांत कोणाला शंका असता कामा नये . कलेला मानवा कडून कोणतीच अपेक्षा नसते .म्हणून ती मानवाची उपेक्षा करत नाही .जातिवंत कलावंतसुध्दा कलेकडून कोणतीच अपेक्षा करत नाही .आणि तो कलेची उपेक्षा हि करत नाही .त्यामुळे आत्ता कलेची उपेक्षा थांबवा असे म्हणणे .हे धादांत खोटं आहे . म्हणजे बघा .राजकीयदृष्ट्या राजकीय क्षेत्राचा आणि कलेचा काहीएक काडीमात्र संबंध नसतो .कृती किंवा वस्तु चा संबंध असतो .तो सुध्दा राजकीय वापर व उपयोग यांवर आधारित असतो .राजकीय क्षेत्र व कलेचा संबंध नाही हे तथाकथित कला इतिहास वाचल्यावर कळून येईलच.तेव्हा तें तथाकथित कलेसाठी (कृतीसाठी)चा संबंध आहे. हे सिध्द होईलच .
तें कळेलही.काही मानवनिर्मित कृती चा संबंध काही तज्ञांनी (डॉक्टरेट) राजकीय इतिहासाशी जोडल्याने तो सामान्य जनतेला कळेनासा झालाय .तो संबंध राजकारणी लोकांनी राजकीय हेतू साठीच वापरला हे नाकारता येत नाही .म्हणून आजही राजकारणी लोकांनी संबंध जोडल्याने, कलेचा नाही.पण वस्तु व कृती चा वापर होतोय .म्हणून त्यांना राजकीय लोकांना कलेचे ज्ञान नसते .मग ती मंडळी कलेदृष्टीने ज्ञानशुन्य असणारी निजपतील नाही तर काय.त्यांना राजकीय क्षेत्रात रस नसता , तर तें कदाचित कलेचे उपासक झाले असते .ना ! .जगभरात , चौकाचौकात ज्यां कृती आपण पाहतो त्या कला नसून त्या राजकीय , सामजिक , काही अंशी मानवाच्या अहंकाराच्या अस्तित्वाच्या चिन्हंरूप कृती आहेत .ज्याला आपण सारे तथाकथित कला म्हणून संबोधत असतो ? वस्तु किंवा कृती ही हेतूपूर्वक उभारावी यांचे भान महत्वाचे आहे .पण होत नाही उभारली जाऊ शकत नाही कारण कोणाचेच (राजकारण्यांनचे) हेतूपूर्वक कृती भान नसते .असूच शकत नाही .जे उभारले जाते .ती फ़क्त कृती पूर्ण वस्तु होऊन राहते .वस्तुरूपकृती ने जर कलेकडे काही अंशी निर्देश जरी केला तरी कृती चे सौंदर्य उपयोगी मूल्य वाढते .मग त्याच्या वापरातली किंमत किती हे महत्वाचे राहत नाही .हे न कळल्याने त्यांना सौंदर्यमूल्य तरी कसे कळणार हा प्रश्न आहेच .कलेचा कधीच प्रोजेक्ट होऊ शकत नाही .वस्तु कृती चा प्रोजेक्ट होतो .कबीरांनी शेलें विणले तें प्रोजेक्ट बनवून नाही तें कलेतूनच घडवले असावेत .कला शिक्षणाचा बोजवारा वाढत आहे .असे म्हणणे म्हणजे सश्याला शिंगे होती असं म्हणण्यासारखे आहे .कारण कला कोणत्याही संस्थेत शिकवली जाऊ शकत नाही .ती जीवनातील शाळेत स्वाध्यायी मार्गानेच कळते .हे सत्य कोण नाकारणार , तेच ज्याना यांचे ज्ञान नाही तेंच असतील .एकमात्र खरं कृतीजन्य शिक्षण याकडे दुर्लक्षच झाले परिणामी बोजवारा वाढत आहे .हे एक कारण आहे .कृतीशिक्षण हे योग्य कसे द्यायचे यांचे योग्य ज्ञानशिक्षण शासनातलें कलाशिक्षक आणि शासनात नसणारे कला शिक्षक व कलाक्लासवाले यांना नाही हे लक्षण दिसून येते .यावरच उपचार होणे गरजेचे वाटते .
( google/ no copyright) |
कला किंवा कृती अभ्यासनारे तथाकथित कलाशिक्षक आहेतच कोठे ? कलाप्रतिनिधी की लोकप्रतिनिधी ? लोकप्रतिनिधी यांना कलेविषयी जाण नाही कारण तें राजकीय क्षेत्रातले आहेत .तें कलारसिक नसून राजकीय सत्तारसिक आहेत.त्यांना जाण असती तर तें तथाकथित कलेतील शिक्षणाच्या अडचणीवर पर्याय काढत कलासमाजात वावरले असते .कला कृती संस्कृती अनेक अंगांनी बहरली असती .प्रत्येक खंड , राष्ट्र हे त्यांच्या त्यांच्या रितीरिवाजाने सांस्कृतिकदृष्टया समृद्ध असतेच.म्हणून तें आजही जिवंत आहे .सांस्कृतिकराष्ट्र ही संकल्पना विकसित करणे , म्हणजे ही संकल्पनाच जणू संस्कृती नसलेले राष्ट्र असा संदर्भ पसरवू पहात आहे .असे सूचित होते .कलेला राष्ट्राची गरज नसते .ती स्वतंत्र आहे .तिला जातपातधर्म नाही .ज्या वस्तु वास्तु कृती प्रत्यक्षात आहेत.त्यांना कदाचित राष्ट्राची गरज भासत असेल .कारण उपयोग आणि वापर महत्वाचा आहे . ही एका मानवाची गोष्ट आहे .
आपला सभोवताल संवेदनशील होऊन जगू लागलो की सर्व प्रकारचे संघर्ष कमी होतात .मानसिक व्याधींपासून निर्माण होणाऱ्या चित्रशिल्पकृती मध्ये घट होते .बौध्दिक कसरती मधून निर्माण होणाऱ्या चित्रशिल्पकृती मध्येही घट होते .मग प्रदर्शन करण्यापेक्षा दर्शन घडवण्याकडे आपण जगण्याच्या अनेक स्तरांवर जगू लागतो .तेव्हा कला फ़क्त राहते .माणुस , राष्ट्र, देश , खंड यामधील कल्पनेत न जगता तो त्यातच वावरतो .तेव्हा सुखापेक्षा आनंदाच्या संवेदनशील अवस्थेत तो जगतो .त्याच्या जगण्यात आणि वागण्यात भेद रहात नाही .तिथेच कला दर्शन त्याला प्रथम होते आणि त्यांच्या व्यक्त होण्याच्या कोणत्याही कृतीतून तें जाणवू लागते .तिच त्याची म्हणून कला असतेच ...इतकंच …
एका मानवाची गोष्ट आहे .
बघा स्वाध्यायी होवून ...! !
' कलास्वाध्याय '
..हंसोज्ञेय तांबे ...
hansodnya@gmail .com
9892729329
No comments:
Post a Comment
Thanks for comment JK