Friday, 26 October 2018

Rare Poem by Pankaja Jk 2010

आमच मात्र ....

सर्व धर्म सम भाव,
गरिबाला खायला वडा पाव 
आमच मात्र सर्व धर्म समभाव .

गरिबीची भीती आम्हा नाही 
आत्महत्य्ने जनतेचे तसे नुकसान नाही,

अहो, अश्या गोष्टींचा आमच्या गावी नाही ठाव,
आमच फक्त एकच ....सर्व धर्म समभाव ....

आतुर माता प्रवासी लेकाच्या चिंतेत,
शेतकऱ्याची काळी आई उगवी न शेत, 
पोट लागले पाठीशी म्हणून गेलो  परदेशी 
महागाई वाढली आता येऊ कसा परतुनी?
अशी ही तुटती घरे आणि व्याकूळ मने,

अरे, अश्या गोष्टींचं आम्हाला काय राव,
आमचं एकच उद्धिष्ट...सर्व धर्म ....

मारतात त्यांना मारू द्या
जगतात त्यांना लाडू द्या 
आमच्या इच्चा पुरती साठी 
लोकांच्या जीवनाची राख- रांगोळी होऊ द्या 

आम्ही नाही कोणास मारले
आमचे हात बघा नाही माखले
मग हा  दोष आम्ही कशा पाई घ्यावा, लेकहो,
आमचा आहे एकच द्य्ह्यास,
सर्व धर्म समभाव हो!

भारतात आहेत जाती हजार 
सर्वांनाच काही न काही त्रास
आम्ही त्यांना बघतो एकाच दृष्टीकोनातून
सगळयांनसाठीच आसवे आमची गेली सुकून, 
मतदानासाठी किती येतील ह्यात आम्ही चिंतातूर,

सर्वांनी यावं हा आपलाच देश, हे आपलंच गाव
इथे कोणी ना परकं, इथे सर्व समान,
कारण, इथे....सर्व धर्म समभाव...

पंकजा. JK
2010